सामाजिक

आर पी आयचा दणका; पाषाण–सुतारवाडी, सुसरोडला एक ते दीड तास अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे आश्वासन


पुणे : पुणे महानगरपालिकेने काल एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकात पाषाण–सुतारवाडी आणि सुसरोड परिसराला केवळ २ ते ३ तास पाणीपुरवठा देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर इतर अनेक भागांना ५ ते ६ तास पाणीपुरवठा देण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली.

या कथित असमान पाणीपुरवठ्याच्या विरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड  संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले. नागरिकांना समान आणि न्याय्य पाणीपुरवठा मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या निवेदनाची तातडीने दखल घेत पुणे मनपा चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्री. साळुंखे यांनी पाषाण–सुतारवाडी आणि सुसरोड परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत एक ते दीड तास वाढ करण्याचे आश्वासन दिले.

या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, प्रत्यक्षात वाढीव पाणीपुरवठा कधीपासून सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *