विश्रांतवाडी परिसरात लोकप्रतिनिधींची थेट पाहणी
पुणे : विश्रांतवाडी परिसरातील सर्वे नंबर 46 नगरमध्ये आज सकाळी सुमारे ९ वाजता स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवक अनिल टिंगरे व नगरसेविका संगीता दांगट यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान ड्रेनेज व्यवस्था व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबाबत नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. अनेक घरांमध्ये साचलेले पाणी, गटारांची अडचण तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी समोर आल्या.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप दांगट, जितेंद्र कराळेकर, सुरेश किर्ते, इरफान शेख आणि अनिल पटेकर यांनीही या पाहणीत सहभाग घेत नागरिकांच्या अडचणी मांडल्या.
- यावेळी नागरिकांनी लवकरात लवकर समस्या सोडविण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले असून, परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

संपादक : नागेश देडे





