सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्सतर्फे पंकज देवरेंना गौरवपत्र


पुणे:-प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, पुणे शाखेतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. पंकज देवरे (भा.प्र.से.) यांना गौरवपत्र देण्यात आले.

या पत्राद्वारे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी देवरे यांच्या कार्यशैलीचे आणि समाजाभिमुख कामकाजाचे कौतुक केले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सर्व समाजातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना समानतेचा वागणूक देऊन न्याय दिल्याबद्दल संस्थेने त्यांचा सन्मान केला आहे.

भारतीय राज्यघटना आणि संविधानाचे पालन करून प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून देवरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगर परिवहन महामंडळात कार्यक्षमतेसह पारदर्शकता वाढल्याचे शेलार यांनी नमूद केले.

शेलार यांनी आपल्या शुभेच्छा देताना म्हटले की, “आपल्या सारख्या आयएएस अधिकाऱ्याची समाजाला आणि राष्ट्राला नितांत गरज आहे. आपली पुढील कारकीर्द अधिक यशस्वी होवो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.”

या पत्राद्वारे देवरे यांच्या प्रशासनातील योगदानाचे आणि सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक व्यक्त करण्यात आले आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *