ताज्या घडामोडी

चंदनगरमध्ये खुलेआम प्लास्टिक विक्री – अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!


पुणे, दि. २५ ऑक्टोबर:

प्लास्टिक बंदीचा नियम राज्यभर काटेकोरपणे लागू करण्याच्या शासनाच्या आदेशानंतरही, पुण्यातील चंदनगर भागात ओम एंटरप्रायजेस या दुकानातून खुलेआम प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक ग्लासची विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे.

लहुजी शक्ती सेना पुणे शहराध्यक्ष शुभम दादू वाघमारे यांच्या माहितीनुसार, त्यांच्या सहकाऱ्यांनी — आकाश वायदंडे व गणेश अडसूळ, अक्षय आल्हाट या दुकानाला भेट दिली असता ही विक्री उघडकीस आली.

दुकानातील कर्मचाऱ्यांनी सरळ सांगितले की, “अधिकारी येतात, काही रोख रक्कम घेतात आणि जातात; आम्हाला काही अडचण येत नाही.” एवढेच नव्हे तर दुकानाचे मालक ओमप्रकाश यांनीही “आम्ही अधिकाऱ्यांना पैसे देतो आणि ते आम्हाला काही करत नाहीत” असे स्पष्ट केले.

या प्रकरणाबाबत चंदनगर परिसरात कार्यरत ASI विनायक बोर्डे यांना कळविल्यानंतर त्यांनी “मग तुम्हाला काय करायचं ते करा” असे उत्तर दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या बेकायदेशीर प्लास्टिक विक्रीला स्थानिक पोलिसांचा मूक पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शुभम वाघमारे यांनी महापालिकेचे अधिकारी संदीप कदम साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. शासनाने घालून दिलेले नियम सर्वांसाठी सारखेच असावेत. अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर विक्रीला आळा घालावा.

राज्य सरकारने आधीच जाहीर केले आहे की, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरीही पुणे शहरातील काही ठिकाणी अशा प्रकारे नियमांचे खुले उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

 प्लास्टिकमुक्त पुण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक!

पर्यावरणप्रेमी संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, अशा दुकानदारांवर तात्काळ छापा मारून कारवाई करावी आणि शहराला स्वच्छ, प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *