विश्रांतवाडी भागामध्ये शारदा हॉटेलच्या बाजूला खुलेआम गुटखा विक्री करत आहे विश्रांतवाडी पान शॉप
खुलेआम गुटखा विक्री — प्रशासनाचे डोळे झाक!
पुणे: विश्रांतवाडी परिसरातील शारदा हॉटेलच्या बाजूला असलेल्या “विश्रांतवाडी पान शॉप” येथे खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे नागरिकांनी उघड केले आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर राज्य सरकारने कडक बंदी घातली असतानाही अशी बेकायदेशीर विक्री सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गुटखा विक्रीमुळे तरुण वर्गाचे आरोग्य धोक्यात येत असून, आरोग्य विभाग आणि अन्न-औषध प्रशासन (FDA) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी देखील अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांचा सवाल:
कायदे फक्त कागदावर आहेत का खुलेआम गुटखा विकला जातोय, तरीही अधिकारी गप्प का?”परिसरातील सामाजिक संघटनांनी या प्रकरणी संबंधित दुकानावर तात्काळ छापा टाकून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत.
ठिकाण: शारदा हॉटेलच्या बाजूला, विश्रांतवाडी मागणी: गुटखा विक्री बंद करून दोषींवर कठोर कारवाई

संपादक : नागेश देडे





