लष्कर-ए-भिमा आणि युगपरिवर्तन सोशल फाउंडेशनतर्फे झोपडपट्टीतील मुलांना दिवाळी साहित्य व फटाके वाटप
पुणे :
लष्कर-ए-भिमा युगपरिवर्तन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने झोपडपट्टीतील लहान मुलांना शालेय साहित्य तसेच फटाके वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन मंदा कुरणेकर व आफरीन नायकवडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी लष्कर-ए-भिमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ धिवार, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस बाबासाहेब नागटिळे, युवक अध्यक्ष पुणे शहर अध्यक्ष रोहित मांढरे, पुणे शहर अध्यक्ष विशाल साळवे, उपाध्यक्ष प्रतीक दादा गायकवाड, दीपक मेघाडी आणि युनूस शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन युगपरिवर्तन सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णचंद्र दायमा यांच्या वतीने करण्यात आले.
दिवाळीच्या आनंदात वंचित मुलांनाही सामील करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.

संपादक : नागेश देडे





