विश्रांतवाडी पोलिसांचे नागरिकांना आवाहन; बॅनर-होर्डिंगवर कडक कारवाईचा इशारा
पुणे प्रतिनिधी:- अनिल पटेकर : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर, पोस्टर व होर्डिंग न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सण-उत्सव, जयंती, वाढदिवस, दुकान उद्घाटन तसेच जाहिरातींसाठी रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्याची वाढती प्रवृत्ती लक्षात घेऊन पोलिसांनी ही सूचना जारी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर किंवा जाहिरात फलक लावण्यासाठी संबंधित परवानगी आवश्यक आहे. विना परवाना लावण्यात येणारे सर्व प्रकारचे बॅनर हे अनधिकृत समजले जातील.
तसेच, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी शहराच्या सौंदर्याचा व सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

संपादक : नागेश देडे





