पुणे नगररोड परिसरात अनधिकृत बांधकामांवर मनपाची मोठी कारवाई
पुणे प्रतिनिधी:-नवनाथ उकारडे
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार लोहगाव व खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला.
ही कारवाई मा. उपआयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार तसेच सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १७ मार्च) सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली.
या मोहिमेत बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता सौरभ खरात उपस्थित होते. कारवाईदरम्यान सुमारे १०,००० चौरस फूट अनधिकृत कच्चे व पक्के शेड/बांधकामे हटवण्यात आली.
- या कारवाईसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता:
पुणे मनपा पोलीस कर्मचारी – २० MSF जवान – ५० जेसीबी – ६ गॅस कटर – २ ब्रेकर – ४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – ६ बिगारी सेवक – २०
मनपाकडून शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरू असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

संपादक : नागेश देडे





