ABOUT USमहाराष्ट्र

घर नाही, तालीम नाही; नंदी बैल फिरवणाऱ्याच्या लेकाने पटकावलं सुवर्णपदक!


पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील लोहगाव परिसरातील १७ वर्षीय सनीच्या जिद्दीसमोर परिस्थितीही हरली!
घर नाही, तालीम नाही — तरीही सनीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
सनीचा वडील नंदी बैल फिरवून घर चालवतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावोगावी फिरून मिळणाऱ्या पैशांत घरखर्च कसाबसा भागवला जातो. तरीही मुलाने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठं स्वप्न पूर्ण केलं.
“माझ्याकडे तालीम नव्हती, पण गावातील मोकळ्या मैदानीत मी रोज सराव करायचो. शिक्षकांनी आणि मित्रांनी प्रोत्साहन दिलं. मला एक दिवस भारतासाठी खेळायचं आहे,” असं सनीनं सांगितलं.
सनीच्या या यशामुळे लोहगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी आणि स्थानिक समाजसेवकांनी त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील प्रशिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *