TERMS & CONDITIONS

अहिल्यानगर सोनाई येथे मातंग समाजाने अभूतपूर्व एकतेचा परिचय देत समाजकंटकांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली.


अहिल्यानगर (सोनाई): प्रतिनिधी
अहिल्यानगर सोनाई येथे मातंग समाजाने अभूतपूर्व एकतेचा परिचय देत समाजकंटकांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. पुणे आणि राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारला आणि समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी समाजातील ऐक्य आणि सजगतेचे दर्शन घडले. उपस्थित बांधवांनी समाजातील अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवला.
दरम्यान, समाज बांधव संजय वैरागर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी विनोद भाऊ वैरागर, संस्थापक आणि अध्यक्ष — भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना — यांनी सांगितले की,
आमचा समाज अन्याय सहन करणार नाही. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
ही घटना मातंग समाजातील एकतेचे आणि सजगतेचे प्रतीक ठरली आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *